योगासना स्पर्धेत अनुभूती स्कूलच्या विवेक सूर्यवंशी याला सिल्वर मॅडेल
जळगाव दि. २९ (धर्मेंद्र राजपूत) – जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस असोसिएशन व सोहम डीपार्टमेंट ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी यांच्या मार्फत जिल्हास्तरीय योगासना स्पोर्टस चॅम्पीयनशीप २०२४-२५ या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात सब ज्युनिअयर मुले व मुली, ज्युनियर मुले व मुली, सिनिअर मुले व मुली अशा चार गटात ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
ट्रॅडिशनल योगा, आर्टीस्टिक सिंगल व पेयर, रिदिमिक पेयर अशा ४ प्रकारात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयअम प्रायमरी व सेकंडरी स्कुल मधील सहा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ट्रॅडिशनल योगासन या प्रकारात पाच आसने कंपलसरी व दोन आसने ऑप्शनल घ्यावी लागतात. कंपलसरी आसन प्रत्येक आसनात ४५ सेकंद स्थिरता ठेवावी लागते आणि ऑप्शनल आसणे १५ सेकंद स्थिर ठेवावे लागते. या योगा प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा इयत्ता ६ वीतील विद्यार्थी विवेक अमोल सूर्यवंशी याने सिल्वर मॅडेल प्राप्त केले.
पारितोषिक समारंभात विजेत्यांना मु. जे. महाविद्यालयाचे जिमखाना विभाग प्रमुख चेतन महाजन, नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर गौरव जोशी, सोहम योग व नॅचरोपॅथीचे संचालक देवानंद सोनार यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जळगाव जिल्हा योगासना स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सतीश मोहगावकर व मु. जे. महाविद्यालयाचे बेलोरकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा योगासन स्पोटर्स असोशिएशनचे सचिव पंकज खाजबागे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. विवेक सूर्यवंशीच्या या यशामुळे संगमनेर येथे होणाऱ्या ५व्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यास योग प्रशिक्षक स्मिता बुरकुल यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला पुढील यशासाठी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी, क्रीडा प्रशिक्षक श्वेता कोळी, यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.