उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसाला कुलभूषण पाटील वाटणार १० हजार छत्री व टीशर्ट
जळगाव दि.२४ (धर्मेंद्र राजपूत) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जळगावचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री येथे भेट घेतली. कुलभूषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले.तसेच जळगांव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले.
कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट
उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या तर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी शर्टचे आज उध्दव ठाकरे यांनी कौतूक केले. छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. यावेळी बाळासाहेबांची २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले.
या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण….
माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुलभूषण पाटील इच्छुक आहे. तसेच ते या निमित्ताने तयारीला लागले आहे.