व्याधीमुक्त जीवनासाठी रक्तदान सर्वश्रेष्ठदान-मुकुंद गोसावी, 14 जून जागतिक रक्तादाता दिवस
जळगाव:14 (धर्मेंद्र राजपूत) 14 जून जागतिक रक्तदाता दिवस असून कुठलही दान करण्याकरिता आपण आर्थिक सक्षम असावं असा काहीसा गैरसमज असतो, परंतु ईश्वराने आपल्याला अनमोल अस शरीर दिलेल असून आपण आर्थिक सक्षम नसतानाही शारीरिक रूपाने मदत करू शकतो, अस शंभरहून अधिक वेळा रक्तदान केलेले मुकुंद गोसावी यांनी रक्तदातादिनाच्या अवचित्य साधन आव्हान केले.आपल्याजवळ जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान माणून आपण इतरांची सहज मदत करू शकतो.
सर्वसामान्यांनाही सहज करता येणारे महत्त्वपूर्ण दान-मुकुंद गोसावी
जागतिक रक्तदाता दिवसाच्या निमित्ताने मुकुंद गोसावी यांनी केले आवाहन-मला पोलिओ आजारामुळे 70% शारीरिक व्याधी असून आज या व्याधीला न जुमानता मी स्वयंस्फुर्त, स्वेच्छेने शंभरापेक्षा जास्त वेळा रक्तदान करू शकलो, अनेकवेळा पांढऱ्या (प्लेटलेट्स) पेशींचेही दान केले आहे. रक्तदानामुळे आज मला कुठलाही शारीरिक त्रास नसून मनाने मला पूर्ण आनंद व स्फूर्ती आहे. वयाच्या 18 वर्षानंतर, 50 किलो पेक्षा जास्त वजन असलेले कुणीही सहज रक्तदान करू शकतो, रक्तदानाकरिता अतिशय अल्पसा वेळ लागतो, रक्तदानाने शारीरिक कुठलाही त्रास होत नाही, एका रक्तदानामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारचे घटक आज तयार होतात, रक्तदाना नंतर कुठलाही सकस आहार आवश्यक नाही,आपण जे नियमित खातो तेही चालतं, आपण दिलेले रक्त काही वेळेतच भरून निघते, आपल्या शरीरात जवळपास सहा ते सात लिटर रक्त असतं त्यातील फक्त साडेतीनशे एमएल म्हणजे पाव लीटर पर्यंत रक्त आपण दान करतो, निसर्गाने सर्वसामान्य व्यक्तीलाही रक्तदान करण्याचं मोठं सौभाग्य दिल आहे, रक्त अजूनही कुठल्याही प्रकारे कृत्रिमरीत्या तयार होऊ शकत नाही, मानवी रक्तातूनच रक्ताची गरज भागवता येते, गंभीर पीडित रुग्ण, थैलेसिमिया ,हिमोफिलिया,सिकलसेल ग्रस्थ, गरोदर महिला रक्तक्षय असलेल्या माता भगिनी आदींना नेहमी सुरळीत रक्ताची आवश्यकता असते याकरिता आपण सर्वांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले पाहिजे. शेवटी रक्तदान सर्वात श्रेष्ठदान आहे. जे तुम्ही आपण सहज करू शकतो. जीवन के साथ और जीवन के बाद भी-मुकुंद गोसावी