महायुतीच्या विजयासह मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आ.किशोर पाटील यांचे हनुमानाला साकडे
पाचोरा (धर्मेंद्र राजपूत)दि,२३ नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा विराजमान व्हावेत व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्या यासाठी शहरातील श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठण व महा आरती करण्यात आली.पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा शिवसेना महायुतीच्या वतीने सकाळी ११ वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती करण्यात आली.
पाचोरा येथील श्रीराम मंदिरात महाआरती व सामुहिक हनुमान चालीसा पठण
यावेळी मंदिर परिसर सियावर रामचंद्र की जय , पवनपुत्र हनुमान की जय ,भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता.
यावेळी उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,तालुका प्रमुख सुनील पाटील,भाजपचे कोष्याध्यक्ष कांतीलाल जैन,रमेश वाणी माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,युवा नेता सुमीत पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख जितेंद्र जैन,तालुका प्रमुख अनिल पाटील, भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश वाणी, यांच्या सह महायुतीतील भाजपा, शिवसेना, मनसे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.