संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थिनी विद्यार्थ्यांकडून घेतली रक्षाबंधन निमित्त अनोखी भेट
जळगाव (धर्मेंद्र राजपूत ) :भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची महिमा विशद करणारा सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते तर भाऊ आपल्या बहिणीला आजन्म रक्षण करण्याची ग्वाही देत असतो. यातही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनाचही संरक्षण झालं पाहिजे म्हणून याच दिवसाच औचित्य साधून रक्षाबंधन हा सण वेगळ्या पध्दतीने साजरा केला. मुलींनी मुलांना राखी बांधून वेगवेगळ्या झाडांची रोपटे देऊन संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली.
मुख्याध्यापक मुकेश नाईक सरांच्या संकल्पनेतून ही पर्यावरण पूरक व निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी असणाऱ्या राख्याची निर्मिती केली. सोबतच शाळेतील वृक्षांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची शपथ घेतली. यावेळी मुलींनी शाळेतील सर्व शिक्षकांना राख्या बांधल्या आणि प्रत्येक शिक्षकांनी प्रत्येकी किमान एक झाड लावण्याचे अभिवचन दिले.
यावेळी शाळेच्या उपशिक्षिका शितल शेजवळ आणि सेजल बोंडे यांनी रक्षाबंधन ची गाणी गायली. तसेच इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी समीक्षा ठाकरे रक्षाबंधन चे महत्व सांगितले तर सूत्रसंचालन शितल कोळी मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व इतर शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.