राजकीयराज्य

मोठी घोषणा: १ जूनपासून राज्यातील सर्व ST बस स्थानकांतील स्वच्छतागृहे होणार ‘मोफत’

कोल्हापूर:राज्यातील लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून प्रवाशांना राज्यातील कोणत्याही एसटी बस स्थानकावर स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत.

 

प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून आधीच ‘स्वच्छता कर’ (Cleanliness Cess) वसूल केला जातो याच निधीचा वापर आता थेट स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी केला जाईल

खासगी कंत्राटदारी बंद: या निर्णयामुळे बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे चालवण्यासाठी असलेली खासगी कंत्राटदार पद्धत बंद केली जाणार आहे. आता एसटी महामंडळ स्वतः या स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाची आणि स्वच्छतेची जबाबदारी घेणार आहे

प्रवाशांच्या तक्रारींची दखल: अनेक बस स्थानकांवर स्वच्छतागृहाच्या वापरासाठी प्रवाशांकडून जादा पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये हा ठोस निर्णय घेतला

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button