जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तीन अट्टल घरफोडे जेरबंद, मुद्देमाल हस्तगत


जळगाव:(धर्मेंद्र राजपूत)दि.2 शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घरफोडीच्या सत्राला लगाम घालण्यात जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला (DB) मोठे यश आले आहे. गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका रहिवाशाच्या घरात झालेल्या चोरीचा तपास करत असताना पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हस्तगत केली आहे.
गेंदालाल मिल येथील रहिवासी रईस शेख यांच्या बंद घरात २३ ते २५ मार्च २०२६ दरम्यान धाडसी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील कपाटातून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९०,४०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांची ‘स्मार्ट’ कारवाईवाढत्या गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी विशेष पथक तयार केले होते.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डॉ.आंबेडकर रिक्षा स्टॉपजवळ सापळा रचून खालील तीन संशयितांना ताब्यात घेतले:१) आदिल शेख मजीद२) गुफरान शेख करीम३) कासिम सैय्यद अलीकाय
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:रोख रक्कम: १७,००० रुपये.दागिने: ९१.९७० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या ४ अंगठ्या, ९७.८९० ग्रॅम वजनाचे चांदीचे जोडवे आणि १.९७० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी.याव्यतिरिक्त, आरोपींनी इतर दोन गुन्ह्यांची देखील कबुली दिली असून त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तपास पथकही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. सुरेश आव्हाड, सफौ/सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतिष पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दिपक शिरसाट, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार या पथकाने केली आहे.




