जळगांव (धर्मेंद्र राजपूत) भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार कुठल्याही प्रकारे बॅनरबाजी होर्डिंग जाहिरात न करता सर्वसामान्य जनतेची सेवा लोकहितार्थ व जनहितार्थ उपक्रम राबवून सेवादिनाने व साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस जळगावात भाजप जिल्हा महानगरच्या वतीने साजरा करण्यात आला भा ज पा महानगरातील नऊ मंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
दि.२२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) येथिल १०० सेवालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाई कांना अन्नदान करण्यात आले या नंतर ‘वसंत स्मृती’ भा ज पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय येथे अवयव दान जनजागृती व अवयव दान या विषयावरती डॉ नरेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमानंतर पदाधिकाऱ्यांनी अवयव दानाचे फॉर्म भरून दिले त्यानंतर शहरातील ९ मंडळामध्ये वृक्षारोपण करण्यात आली तर या प्रसंगी महानगर जिल्हाध्यक्षा सौ उज्वला ताई बेंडाळे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,लोकसभा प्रभारी डॉ राधेश्याम चौधरी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी,महेश जोशी, माजी उपमहापौर सुनील खडके, रेखाताई वर्मा, नगरसेवक विरेन खडके, विजय पाटील, महेश चौधरी,राजेंद्र मराठे मनोज भांडारकर प्रकाश पंडित अतुल बारी, रेखाताई कुलकर्णी, रेखाताई पाटील चंदन महाजन, प्रकाश बालाणी, अक्षय चौधरी, दीप्तीताई चिरमाडे, परेश जगताप, शक्ती महाजन, विजय वानखडे, भूपेंद्र कुलकर्णी, भूषण भोळे, मूविकोराज कोल्हे, राहुल पाटील, मिलिंद चौधरी, भाग्यश्री ताई चौधरी, सरोजताई पाठक, नंदिनीताई दर्जी, चित्राताई मालपाणी, संगीता ताई पाटील, शालू ताई जाधव, अशपाक खाटीक, जावेद खाटीक, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते..