जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

जळगाव, (धर्मेंद्र राजपूत) दि. १३ सप्टेंबर 2025–जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रोहित निकम आणि राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली.सभेत राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य पदी निवड झाल्याबद्दल पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांचे सर्वानुमते अभिनंदनाचा ठराव मंजूर करून सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. निकम म्हणाले, “संस्था कोणतीही असो ती आपली मानून काम केले तर सहकार क्षेत्रात प्रगती निश्चित होते. आपली संस्था ही कृषि औद्योगिक संस्था आहे आणि आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेक इन इंडिया’ व ‘लोकल टू ग्लोबल’ ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “मला या संस्थेचा अभिमान आहे की प्रगतिशील वाटचाल आजही सुरू आहे. लहानपणी ६० वर्षांपूर्वी माझे वडील बॅरिस्टर निकम यांच्यासोबत सभेला येत असे, आज पुन्हा या मंचावर येऊन आनंद होत आहे. चेअरमन रोहित निकम यांच्या नेतृत्वाखाली संस्था नफ्यात असून सुव्यवस्थित कारभार सुरू आहे. हे पाहून समाधान वाटते. जिल्ह्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे . अशा सातत्याने अ वर्ग मिळणाऱ्या संस्था महाराष्ट्रात क्वचित पाहायला मिळतील . ” असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी चेअरमन रोहित निकम यांनी वार्षिक कामकाजाचा आढावा सादर केला. संस्थेच्या हिताच्या दृष्टीने करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपाध्यक्ष अरविंद देशमुख, संचालक संजीव पाटील, रामनाथ पाटील, यादवराव पाटील, रमेश पाटील, सुधाकर पाटील, मंगेश पाटील, शांताराम सोनवणे, सोनल पवार, श्वेतांबरी निकम, अरुण देशमुख, प्रशांत चौधरी, गजानन देशमुख, विवेक पाटील, पुंडलिक पाटील, प्रताप पाटील, अरुण पाटील, निळकंठ नारखेडे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक पुंडलिक पाटील यांनी केले तर व्यवस्थापक श्री. पाटील यांनी संस्थेचा लेखा जोखा सादर केला. आभार प्रदर्शन रमेश पाटील यांनी केले.