राज्यस्थानिक बातम्या

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक चे उत्साहात उद्घाटन को

जळगाव, दि. 19 (धर्मेंद्र राजपूत) – नेत्ररुग्णांच्या खास सोयीसाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत कांताई नेत्रालयाचे ‘ॲडव्हान्स्ड आय केअर’, हेल्थ केअर फार्मासी, आय केयर बुटिक, सुसज्ज अद्ययावत सेंटर तसेच चष्म्यांचे अत्यंत आधुनिक आणि भव्य दालनाचे शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांच्या ‘श्री क्लिनिक’ येथे शहरातील सर्व समाजातील प्रतिनिधी म्हणून 26 मान्यवरांच्या शुभहस्ते आज उद्घाटन उत्साहात झाले.

आरंभी जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रास्तविक केले. यात सौ. कांताई यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने श्रध्देय भवरलालजी जैन यांनी सात वर्षापूर्वी कांताई नेत्रालय स्थापन केले. सर्व समाजातील सर्व घटकापर्यंत नेत्र चिकित्सा उपलब्ध व्हावी या हेतुने कांताई नेत्रालयाचे ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटर काम करेल असा विश्वास व्यक्त करत या सेंटरचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पध्दतीने व्हावी ही संकल्पना उपस्थितीतांना सांगितली.
आज कांताई नेत्रालयाच्या ॲडव्हान्स्ड आय केअर सेंटरचे महापौर जयश्री महाजन, कांताई नेत्रालयाच्या संचालिका डाॕ. भावना जैन, संघपती दलिचंदजी जैन, डॉ. दिलीप पटवर्धन, ईश्वरलाल जैन, डाॕ. सुभाष चौधरी,अशोक जैन, सौ. रत्नाभाभी जैन, राजेंद्र मयूर, डाॕ. जी. एन. पाटील, डॉ. के. बी. पाटील, रजनीकांत कोठारी, खजानसिंग छाबडा, रविंद्र जाधव, हरिष मिलवाणी, भरत अमळकर,नंदुदादा बेंडाळे, गिमी फरहाद, डाॕ. सुनिल नाहटा, डाॕ. राहुल महाजन, डाॕ. शेखर रायसोनी, डाॕ. विश्वेश अग्रवाल, ॲड. अकिल ईस्माईल, डाॕ. के. के. अमरेलीवाला, नितीन लढ्ढा, राजेंद्र नन्नवरे यांच्याहस्ते आगळ्यावेगळ्या पध्दतीने उद्घघाटन झाले. याप्रसंगी अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह जैन परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आ. सुरेश भोळे, शिरीष बर्वे, अनिश शहा यांच्यासह शहरातील मान्यवरांची उपस्थितीती होती.

प्रतापनगर येथे आय केअर व चष्म्यांचे दालन रुग्णांच्या सेवत

नत्ररुग्णांचा उपचार होईल असे मल्टीस्पेशॅलीटी आय हॉस्पीटल शहरात उभारले गेले असून कांताई नेत्रालयाची आशादायी वाटचाल सात वर्षात कांताई नेत्रालयाने नेत्रदीपक कार्य केले. आरोग्य क्षेत्रात मोठा लौकिक प्राप्त करून एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. २२ हजारहून अधिक शस्त्रक्रिया आणि सव्वा दोन लाखाच्यावर नेत्र तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. शिबिराच्या माध्यमातून जळगाव, जालना, बुलडाणा जिल्ह्यातील गरजू नेत्र रुग्णांपर्यंत कांताई नेत्रालय पोहोचले आहे. नेत्ररुग्णांसाठी सोईचे व्हावे या हेतुने शहरात “कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअर” या नवीन शाखेचा आरंभ झाला.

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स्ड आय केअरची वैशिष्ट्ये

मोतिबिंदू विभाग – (अत्याधुनिक सेंच्युरीअन गोल्ड मशिनद्वारे अतिसूक्ष्म छेद घेऊन २० मिनिटांहून कमी वेळात मोतिबिंदू पासुन मुक्तता), रेटिना विभाग – (ईंट्राव्हिट्रीयल ईंजेक्शन्स् लेझर्स व शस्त्रक्रिया), कॉर्निया विभाग – डोळ्यातील बबुळासबंधी उपचार व शस्त्रक्रिया, लहान मुलांमधील दृष्टीदोष निवारण विभाग – (तिरळेपणा, जन्मजात मोतिबिंदू, आळशी डोळा व इतर नेत्रदोष उपचार व शस्त्रक्रिया), मायोपिआ क्लिनीक, कॉन्टॅक्ट लेन्स् क्लिनीक, प्रशिक्षीत व अनुभवी ऑप्टोमेट्रीस्टस्, समुपदेशन विभाग, प्रत्येकाची कार्यपद्धत, गरज व वापर लक्षात घेऊन कस्टमाईज्ड चष्मा बनविण्याची सुविधा, सर्व प्रकारच्या औषधी उपलब्ध, डिजीटल मेडीकल रेकॉर्ड सिस्टीम, ऑनलाईन अपॉईन्टमेंटची सुविधा, कॅशलेस मेडिक्लेम असे खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button