क्रीडा

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

स्पर्धेत बेस्ट मिड फिल्डर अभंग जैन तर बेस्ट स्कोरर आकाश कांबळे

जळगाव, दि. २८ ( धर्मेंद्र राजपूत) – मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघ अंतिम विजेता ठरला आहे. पहिल्यांदा सहभागी झालेल्या जैन इरिगेशनच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत विक्रमी ३० गोल केलीत. या विजयामुळे प्रतिष्ठित असलेल्या ‘एलिट लिग’ स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. बेस्ट मिड फिल्डर म्हणून अभंग अजित जैन, बेस्ट स्कोरर म्हणून आकाश कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.

 

मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा अंतिम सामना बांद्रा नॅव्हील डिसूजा ग्राऊंडवर झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगतातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘ए’ व ‘बी’ गृप मध्ये ही स्पर्धा होत आहे. यात जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचा फुटबॉल संघ पहिल्यांदा सहभागी झाला होता. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून आघाडी घेतली. स्टेट बँक ऑफ इंडिया, नेव्हल डॉकयार्ड, सॅब केमिकल, एचडीएफसी, सेंट्रल रेल्वे, टेली परफॉर्मन्स, जी. एम. पोलीस या मातब्बर संघाविरूद्ध ३० गोल जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी मारले.

 

प्ले ऑफ च्या लढतीत जैन इरिगेशनने सेंट्रल रेल्वेचा २-१ ने पराभव केला. दुसऱ्या प्ले ऑफ च्या लढतीत टेली परफॉर्मन्स ला २-० ने नमवून अंतिम सामन्यात जी. एम. पोलीस यांच्याशी जैन इरिगेशन भिडले. कौशिक पांचाळ याने पहिला गोल २ मिनिटात, दुसरा गोल ३ मिनिटात केला. तर पहिल्या हाफ मध्येच तिसरा गोल फवाझ अहमद यांनी केला. लागलीच १८ व्या मिनिटाला चौथा गोल अभंग जैन यांनी करून जी. एम. पोलीस यांना चक्रावून सोडले. त्यात कौशल पांचाळ याने शेवटचा गोल मारून हॅट्रीक साधली. जी. एम. पोलीस संघावर ५-१ ने एकतर्फी विजयी जैन इरिगेशनने मिळविला.

 

पहिल्या सामन्यापासून प्रथम स्थानावर राहिल्याने विजयी ठरला. आक्रमक शैलीतून खेळलेल्या जैन इरिगेशनच्या फुटबॉलपटूंनी स्पर्धेत आपली छाप सोडली. झालेल्या आठ सामन्यांमध्ये जैन इरिगेशनकडून आकाश कांबळे ७ गोल, कौशिक पांचाळ ७ गोल, अभंग जैन ५ गोल, फवाज अहमद ३ गोल, मोईझ अकमल २ गोल, यश सहानी ३ गोल, अरशद शेख २ गोल, रोहित फतियाल १ गोल असे एकूण ३० गोल केलेत. मुख्य संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन काम पाहिले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी कौतुक केले

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button