क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

आरोग्यदायी संस्कृतीसाठी योगाभ्यास करण्याचा संकल्प

जळगाव, दि. २१ (JALGAON TIMES) :- स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी योग्य ‘योग आणि आहार’ या विषयावर ११ वा जागतिक योग दिन जैन इरिगेशन सिस्टीम्स व जैन फार्मफ्रेश फूडस लि.सह आस्थापनांमध्ये उत्साहात साजरा झाला. कंपनीच्या आरोग्यदायी व सकारात्मक कार्यसंस्कृती निर्मितीसाठी सहकाऱ्यांनी रोज योगाभ्यास करण्याचा संकल्प केला.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन यांची अशी भावना होती की, ‘माझ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या वाट्याला निरोगी, सुदृढ आरोग्य यावे. त्यादृष्टीने निसर्गपुरक जीवनशैली, व्यायाम आणि आहार-विहार याकडे कटाक्षाने लक्ष्य द्यावे, योग दिनाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली आणि कार्यसंस्कृतीला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. हाच संस्कार घेऊन जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांचेही सहकाऱ्यांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष्य असते.

जैन हिल्स येथील जैन फूड पार्कच्या स्पाईस रिसीविंग विभागात जागतिक योग दिवस साजरा झाला. जैन अॅग्री पार्क, जैन फूड पार्क, जैन स्पाईस, जैन टिश्यूकल्चर लॅबमधील सुमारे १४०० हून अधिक स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी योगाभ्यास केला. योगशिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. जैन महासतीजी प.पू. डॉ. इनितप्रभाजी महाराज साहेब यांनी योगाचे मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद करून मंगलिक आशीर्वाद दिले. सुरूवातीला सूक्ष्म व्यायाम, त्यानंतर ओंकार, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानधारणा यासारख्या योगक्रियांनी मन, आत्मा आणि शरीर यांच्यात समन्वय साधण्याचा अनुभव सहकाऱ्यांनी घेतला. ‘जैन भूमिपुत्र’च्या संपादकीय विभागाचे सहकारी किशोर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. मोनिका भावसार यांनी ‘आहार, आरोग्य आणि जीवनशैली’ याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी मानवसंसाधन विभागाचे वरिष्ठ सहकारी जी. आर. पाटील, राजेश आगीवाल, भिकेश जोशी, वैभव चौधरी, सुचेत जैन, आर. डी. पाटील, चंद्रकांत चौधरी, अजय काबरा, ईश्वरसिंग पाटील, दिनेश चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

जैन प्लास्टिक पार्कला स्वास्थापूर्ण आरोग्यासाठी योग करण्याचा संकल्प

स्वास्थपूर्ण आरोग्यासाठी ‘योग आणि आहार’ अशा जीवनशैलीत बदल करण्याचा संकल्प करत प्लास्टिक पार्क मधील सहकाऱ्यांनी योग दिन साजरा केला. सूर्यगिरीजी अर्थात सुभाष जाखेटे यांनी योगाभ्यास करुन घेतला. ओमकार मंत्राने सुरवात झाली. तितली आसन, भ्रामरी प्राणायामाद्वारे गुंजन, पद्मासन, वज्रासनसह अन्य योगाभ्यास करीत भारतीय संस्कृतीने जगाला योग दिल्याचे त्यांनी सांगितले. पर्सोनेल विभागाचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांनी सुभाष जाखेटे यांचे स्वागत केले. कंपनीमधील प्रत्येक सहकाऱ्याचे आरोग्य हे उत्तम रहावे या भावनेतून मोठ्याभाऊंनी सुरू केलेला योगाभ्यास वर्ग नियमीत होत असतात, अनेक सहकारी त्याचा लाभ घेत असल्याचे त्यांनी म्हटले. किशोर बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्ञानेश पाटील, अनिल जैन यांच्यासह कार्मिक विभागाच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

हायटेक प्लॉट फॅक्टरी टिश्यूकल्चर पार्क टाकरखेडा

योगशिक्षका सौ. कमलेश शर्मा यांनी हायटेक प्लॉट फॅक्टरीमधील महीला सहकाऱ्यांकडून योगाभ्यास करून घेतला. यावेळी डॉ. कल्याणी मोहरीर व विजयसिंग पाटील यांनी योगशिक्षिका कमलेश शर्मा यांचे स्वागत केले. बैठे कामांमुळे महिलांमध्ये होणाऱ्या व्याधींना दूर करण्यासाठी असणारी योगासने त्यांनी समजून सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयसिंग पाटील, पर्सोनेल विभागाचे सहकारी एस.बी. ठाकरे, मनोहर पाटील आणि डॉ. ज्ञानेश्वर पाटील, डॉ. अश्विनी पाटील, प्रवीण पगारिया, प्रशांत चौधरी यांनी परिश्रम घेतले.

अनुभूती निवासी स्कूल

अनुभूती निवासी स्कूल मध्ये सकाळी ६ ते ७ यावेळेत विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. डॉ. स्नेहल फेगडे यांनी विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली. मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व तसेच एकाग्रतेसाठी विद्यार्थ्यांनी योग का करावे हे समजून सांगितले. योगमंत्राने कार्यक्रमाची सुरवात झाली. यानंतर विविध प्रात्याक्षिके करण्यात आली.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button