प्राण्यांची तहान भागवण्यासाठी श्री कच्छ केशरी जैन फाऊंडेशन करत आहे पाण्याचे भांडे ठेवायला शहरात सुरुवात

जळगांव टाईम्स न्यूस | दि.2मार्च | उन्हाळ्यात माणसांप्रमाणेच प्राणी आणि पशुपक्ष्यांनाही पाण्याची सर्वाधिक गरज भासते.कडाक्याच्या उन्हात पाण्याची तहान भागवण्यासाठी पक्ष्यांची अविरत धडपड सुरू असते. या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जिवाला थोडासा गारवा देण्यासाठी जळगावतील काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.प्राण्यांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी श्री कच्छ केशरी जैन फाउंडेशन आणि द फ्रेंड्स ऑफ ऍनिमल यांच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. शहरात पाण्याची शंभर भांडी ठेवण्यात येणार असून याचा प्रारंभ रविवारी गौ शाळेत करण्यात आला.
सध्या उन्हाळ्याला सुरुवात होऊ लागली आहे.जसे मनुष्याला पाण्याची गरज असते तशी प्राण्यांनाही पाण्याची गरज असते.त्यांची तहान भागविणे आपले कर्तव्य आहे.पावसाळ्यात त्यांना कुठेही पाणी उपलब्ध होते; मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत प्राण्यांना पाणी मिळणे कठीण झाले असून त्यांचे हाल होत आहेत.
प्राण्यांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन श्री कच्छ केसरी जैन फाउंडेशनच्या माध्यमातून प्राण्यांना पाण्यासाठी शहरात भांडी ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ” द फ्रेंड्स ऑफ ऍनिमल ” संस्थेच्या मदतीने शहरात प्राण्याच्या पाण्यासाठी भांडी ठेवण्याचा प्रारंभ करण्यात आला यावेळी हितेश पोलडिया,धर्मेंद्र गोसर,मिहीर शहा,मितेश शहा,हितेश कांकण,भरत सावळा,कन्हैया सावळा,जतीन खोना,रविश लोदया,कल्पेश चेड्डा,पूर्वेश शहा,योगेश वानखेडे आदीची उपस्थित होते.