स्थानिक बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

जळगाव, दि.१ (धर्मेंद्र राजपूत ) – गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ब्लिस वॉक अर्थात जीवनात परमानंदाची अनुभूती देणार्‍या नवीन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय प्रसन्न, आनंददायी, शांतीचा अनुभव देणाऱ्या व जीवनात सकारात्मकता देणारा हा ब्लिस वॉक होता. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात परमानंदाची संकल्पना विस्ताराने मांडत त्याचा मानवी जीवनाशी संबंध उलगडण्यात आला.

 

साडे तीन किलोमीटरच्या या वॉकमध्ये अध्यात्मिक व योगशास्त्रीय पंचकोशातील अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोषाची तोंड ओळख करून देण्यात आली. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची कार्यपद्धती त्यांचे जीवनातील महत्त्व सांगण्यात आले. आनंद मिळविण्यासाठी अष्टांग योग व दासबोधात समर्थ रामदासांनी मांडलेली नवविधाभक्ती कशी उपयुक्त ठरते यावरही प्रकाश टाकण्यात आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आनंदाच्या वाटा आपण शोधल्या पाहिजेत, स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, आपल्या कामातील आनंद मिळविला पाहिजे, आपल्या सोबत इतरांनाही आनंद घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे असे आवाहनही गांधी रिसर्च फाऊंडेशनचे गिरीश कुलकर्णी यांनी केले. संस्था पीस वॉक, नेचर वॉक, बर्ड वॉचचे नियमितपणे व वेगवेगळ्या प्रसंगी आयोजन करीत असते. डॉ. अश्विन झाला यांनी पंचमहाभूतांचे मानवी जीवनाशी संबंध व त्याचे महत्त्व थोडक्यात विशद केले. या पीस वॉकमध्ये ५५ स्त्री-पुरुष व मुलांचा सहभाग होता.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button