राष्ट्रीय

भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे साहित्य कला 2021 पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगावदि.13 (प्रतिनिधी)  ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे तितकीचे महत्त्वाची कला आहे. आर्टिस्ट होणं किंवा होऊ देणं हे महत्त्वाचे असून कला, साहित्य, चित्रकला शिल्प कला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपण समृद्ध होऊया समाजाला उत्क्रांत अवस्थेत नेण्याची क्षमता केवळ कलांमध्ये असते असे प्रतिपादन ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले.

जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते सन्मानपूर्ण प्रदान केला गेला. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. याप्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर, संघपती दलिचंद जैन, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सौ.निशा जैन, डाॕ. भावना जैन व सन्मानार्थी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बहिणाई पुस्तक प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक अशोक चौधरी, संपादन सहाय्यक ज्ञानेश्वर शेंडे, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थीत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जी. शेखर पाटील यांचीही उपस्थीती होती. यावेळी चौघेही पुरस्कार्थींची कार्य परिचयात्मक डॉक्युमेन्ट्री दाखविण्यात आली.

प्रस्ताविक रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. यात त्यांनी श्रध्देय भवरलालजी जैन हे कला, साहित्य आणि संस्कृती ही विश्वाची किल्ली मानत असे सांगितले. जळगाव हे कवितेचे गाव असून नामांकित कविंची मोठी परंपरा या गावाला असल्याचे ते म्हणाले.

आरंभी दिपक चांदोरकर यांनी पसायदान तर शेवटी राष्ट्रगित म्हटले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button