मराठा महासंघ आणि शिंपी समाजाचा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा
चाळीसगाव (धर्मेंद राजपूत ): चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे अधिकृत मंगेश चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून आणि सर्वसमावेशक समाजकारणाला प्रभावित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आ.मंगेश चव्हाण यांना अधिकृत पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. निवडणूक जवळ येत असताना दिवसेंदिवस वाढत चाललेला विविध संघटनांचा पाठिंबा यामुळे विकास कामांसाठी अजुनच बळ मिळत असल्याचे यावेळी आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
आ.चव्हाण यांची विकासाची दुरदृष्टी आणि सर्व समावेशक दृष्टिकोनावर भरोसा ठेवून दिला पाठिंबा
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना भेटून आणि सगळ्यांच्या सह्या करुन संघटनेच्या अधिकृत लेटरवर लेखी स्वरूपात आपला पाठिंबा जाहिर केला आहे. यावेळी मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे पाटील, अशोक भोसले जिल्हा कोषाध्यक्ष, नंदकिशोर पाटील शहर अध्यक्ष, अमोल पाटील तालुकाध्यक्ष, किरण जाधव उप शहराध्यक्ष, शेखर पाटील तालुका संघटक, सुरेश कोल्हे, आकाश राणा, प्रल्हाद बळे, प्रथम पाटील, रामराव पाटील, कैलास पाटील, जयसिंग सोनवणे, रामदास पाटील, भगवान पाटील, सोमनाथ मोहिते, सुरेश पाटील, महेश पाटील, दत्तात्रेय पाटील, बापुराव पाटील, युवराज शिंदे, योगेश नवले, कल्पेश महाले, रामदास शिंदे, दिगंबर पाटील, मनोज गुंजाळ, रविंद्र देशमुख, सागर गायकवाड, कृष्णा पवार, दिलीप सोनवणे, दिनेश नवले, विजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्वाक्षऱ्या करुन पाठिंबा जाहीर केला आहे.
चाळीसगाव शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष दिलीप कापडणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी समाजातील महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी शिंपी समाजाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.