सफाई कामगारांचे रिक्तपदे बाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव-नगरसेवक चेतन सनकत
जळगाव प्रतिनिधी दि.26/1.जळगाव शहर महानगर पालिकेचे नगरसेवक चेतन गणेश सनकत यांनी नुकचेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान सफाई कामगारांची 523 पदे समाविष्ट करणे या मुख्य विषयाचा प्रस्ताव नगर सेवक चेतन सनकत यांनी दिला.
महापालिकेच्या रिक्त झालेल्या जागा त्वरीत भरण्यात यावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरवठा सुरू होता दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे हा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरसेवक चेतन सनकत यांनी आकृतीबंध मधे सफाई कामगारांची 523 पदे समाविष्ट करणे या विषयाचा प्रस्ताव दिला त्या प्रस्ताव वर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आकृतीबंध मधे समाविष्ट करण्याचे निर्देश प्रधान सचिव यांना यावेळी दिले आहेत त्यामुळे आता आकृतीबंध मधे सफाई कामगारांची 523 पदे समाविष्ट होणार आहे. अशी माहिती मनपा नगर सेवक चेतन सनकत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दरम्यान जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, शहराचे आमदार राजू मामा भोळे व अंबरनाथ शहराचे कांक्रीट मॅन माजी नगर अध्यक्ष सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले