आमदार किशोर आप्पा पाटील हे विकासाचे समीकरण- माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील
आप्पांनी गिरणा नदिवरील पुलाचा शब्द पाळला
भडगाव ता.4: भडगाव शहराच्या या पाच वर्षात चेहरा मोहरा बदलविण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आमदार किशोर पाटील म्हणजे विकास असे जुणू काही समीकरण बनल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.
भडगाव शहरातील पुढील पंचवीस वर्षाची पाणीटंचाई लक्षात घेऊन आमदार किशोर आप्पा पाटील यानी तब्बल 133 कोटी खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजुर केली आहे. त्यात गिरणा नदिवर पक्का बंधार्यासह जलशुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश आहे. त्यामुळे शहराची पाणीटंचाई निकाली निघणार आहे. शिवाय शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापनासाठी म्हणजेज भूमिगत गटारीसाठी तब्बल 82 कोटीची योजना मंजूर करून आरोग्याचा प्रश्न ही निकाली निघाला आहे. तर त्यामुळे शहरातील रस्ते खोदले जाणार आहेत. त्यासाठी रस्त्याचा तब्बल 170 कोटीचा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. शिवाय भडगाव शहरात तळणीपरीसराचा व गिरणा काठावरील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाठी पर्यटन विकास योजनेतुन 7 कोटीचा निधी मंजुर करून शहराच्या वैभवात मोठी पडणार आहे. ही दोन्ही कामे सुरू आहेत. तर शहरातील 50 ओपनस्पेस विकसित करण्यात आले आहेत. तर 30 ओपन स्पेसचे कामे मंजुर करण्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांना यश आले आहे. बाळद रस्त्याची परीस्थीती अंत्यत बिकट होती तो रस्ता काॅक्रीटीकरण करून प्रश्न सोडवला आहे. साई मंदिराच्या विकासाठी निधी दिला आहे. जयहिंद , उज्ज्वल, शिवशक्ती काॅलनीचा सुशोभीकरणासाठी निधी देऊन परिसराच्या वैभवात भर घातल्याचे राजेंद्र पाटील यांनी सांगीतले
आप्पांनी गिरणा नदिवरील पुलाचा शब्द पाळला
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भडगाव शहर वासीयांना गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ याठीकामी गिरणा नदिवर पुल बांधुन जुन्या भडगाव शहरातील शेतकर्याना शेतात जाण्याची मोठी सोय होणार आहे. तर जुन्या गावातील व्यापार ही वृध्दिंगत होण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय जुन्या वाक रस्त्यावर ही गिरणा नदिवर पुल बांधून तब्बल 2-3 किलोमीटरचा फेरा वाचविला आहे. हे पुल बांधले जातील असे स्वप्न आम्ही कधी पाहीले नव्हते असे सांगत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कडे विकासाचे व्हीजन असल्याचे मत माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.