आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर करवाई व्हावी-युवासेनेची मागणी
जळगांव प्रतिनिधी दि.19 शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ला बाबत महाराष्ट्र पोलीस दलातर्फे देण्यात येणारे सुरक्षा कवच मंगळवारी रात्री 11 वा. काढण्यात आले व त्या नंतर रात्री च्या सुमारास त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टंप फेकून हल्ला करण्यात आला. त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने आरडाओरड केल्याने हल्लेखोर पसार झाले.
एका लोकप्रतिनिधीच्या घरी याप्रकारचा भ्याड हल्ला होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. सुरक्षा काढल्यानंतर लगेचच काही तासात याप्रकारचा हल्ला होणे हे पूर्वनियोजित असल्याचे दिसून येते. देंवेंद्रजी फडणवीस साहेब आपण महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख म्हणून काम करीत आहात. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेले प्रकार कायदा व सुव्यवस्थेसाठी धोकादायक आहेत. महाराष्ट्र पोलीसांवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आपण योग्य ती कारवाई कराल अशी आशा आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आरोप-प्रत्यारोप होतच असतात पण याप्रकारे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरावर हल्ला चढविणे हा अतिशय निंदनीय व महाराष्ट्राला बदनाम करणारा प्रकार आहे.
गृहमंत्री म्हणून आपण या झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश करावे व त्वरीत या विषयी गुन्हा दाखल करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी या विषयाचे निवेदन युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने उपजिल्हाधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले.
यावेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, कॉलेज कक्ष अधिकारी प्रितम शिंदे, लोकेश पाटील, निखील मोरे, सयाजी जाधव, विशाल सोनार, अमय पाटील आदि युवासैनिक उपस्थित होते. यावेळी “भ्याड हल्ला करणाऱ्यांचा निषेध असो” , “महाराष्ट्रातील संस्कृतीला काळीमा फसणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहीजे”, अशा घोषणा देण्यातआल्या