गणेशोत्सव विसर्जन काळात जळगाव शहरातील वाहतुक मार्गात बदल
जळगाव दि. 13 – शहरात 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील सार्वजनिक, खाजगी, व घरगुती श्री गणेश मुर्तींचे विसर्जन मिरवणुकांसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.
जळगाव ते पाचोऱ्या वरुन येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बसेस, अवजड वाहने करीता इच्छादेवी चौकी – डी मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्राप्पेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व प्रकारचे अवजड वाहने विसर्जन दरम्यान बंद राहील. तसेच जळगाव ते पाचोरा येणारी व जाणारी वाहतुक (हलक्या व मध्यम वाहनाकरीता) – इच्छादेवी चौकी – डि मार्ट – मोहाडी रोड Y पॉईंट – गायत्री नगर – गणेश घाट – सेंट टेरीसा स्कुल – हॉटेल ग्रॅपेस – मलंगशहा बाबा दर्गा – शिरसोली रोड वरील वाहतुक जळगाव कडे येणा-या व जाणा-या सर्व मध्यम व हलक्या वाहनांकरीता मार्ग बंद राहिल.
जळगाव कडून पाचोऱ्याकडे जाणा-या कार व मोटार सायकल करीता आकाशवाणी चौक – काव्यरत्नावली चौक – महाबळ चौक – संत गाडगेबाबा चौक – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – मलंगशहा बाबा दर्गा मार्गे पाचोरा कडे आणि पाचोऱ्याकडून जळगाव कडे येणा-या कार व मोटार सायकलसाठी मलंगशहा बाबा दर्गा – गुरू पेट्रोलपंप (G मॉल) – राजे संभाजी चौक (मोहाडी रोड) – संत गाडगेबाबा चौक – महाबळ चौक – काव्यरत्नावली चौक – आकाशवाणी चौक मार्गे जळगाव कडे पर्यायी मार्ग असणार आहे.
आसोदा- भादली कडून जळगाव कडे येणा-या व जाणा-या एस.टी. बसेस व इतर सर्व वाहने मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावेतो या कालावधीत मोहन टॉकीज – गजानन मालुसरे नगर – जुने जळगाव – लक्ष्मी नगर – कालंका माता मंदीर मार्गे – महामार्गावरुन अजिंठा चौक – आकाशवाणी चौक – नविन बस स्टॅण्ड या मार्गाचा वापर करु शकतील. पाचोरा कडून येणा-या जड वाहनांन करीता वावडदा – नेरी – अजिंठा चौक मार्गे जळगांव पर्यायी मार्ग असणार आहे असेही डॉ. रेड्डी आपल्या आदेशात म्हटले आहे.