Uncategorized

आमदार सुरेश भोळे व खा.वाघ यांच्या प्रयत्नांनी अचानक रद्द झालेल्या रेल्वेगाड्या मिळाली “एक्स्प्रेस” !

जळगाव (धर्मेंद्र राजपूत) : अचानक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने १५० ते २०० प्रवाशांचे पाचोरा, चाळीसगाव जाण्याचे मार्ग बंद झाले. त्यामुळे खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांनी तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून विद्यार्थ्यांना रेल्वे उपलब्ध करून दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांसह प्रवाश्यांनी आभार मानत काढले फोटो 

मुंबईहून जळगांवकडे येत असताना खा. स्मिताताई वाघ व आ. राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगांव रेल्वे स्टेशनला उतरले त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजची मुलं मुली विद्यार्थ्यांची परीक्षा होती. त्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांना माहिती दिली की आज भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केला.

आम्ही सर्व १५० ते २०० प्रवाशांना आता पाचोरा-चाळीसगाव जाण्यासाठी एकही गाडी नाही. तेव्हा खा. स्मिताताई वाघ यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर २२१८४ साकेत सुपर फास्ट एक्सप्रेसला जळगांव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे निर्देश दिले. त्यावेळी सर्व विद्यार्थिनी व प्रवाश्यानी खा स्मिताताई वाघ व आ राजुमामा भोळे यांचे आभार मानले. अनेक मुलांना खा. स्मिता वाघ व आ. राजूमामा भोळे यांच्यासोबत त्याठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नाही.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button