राजकीय
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन ; मंत्री गिरीश महाजन यांनी केले स्वागत
जळगाव दि 9 ( जिमाका ) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आज संध्याकाळी 9 सप्टेंबर रोजी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केले. तसेच खा. स्मिता वाघ, आ. चिमणराव पाटील, आ.सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगर पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनीही स्वागत केले.
विमानतळावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.