डॉ.विवेक मनोहर पाटील “नॉर्थ महाराष्ट्र आयकॉन 2024 अवॉर्डने सन्मानित
जळगाव (धर्मेंद्र राजपूत) दि ३०: प्रतिमन होमिओपॅथी क्लिनिकचे, डॉक्टर विवेक मनोहर पाटील, यांना रेडिओ सिटीतर्फे ‘एक्सलन्स इन प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी’ या क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल, ‘नॉर्थ महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड २०२४’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नाशिक येथे सिनेअभिनेते प्रवीण तरडेंच्या हस्ते प्रदान झाला.डॉ. विवेक हे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील यांचे सुपुत्र आहेत.
जळगाव मधील नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर असून प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथी वर त्यांचे प्रभुत्व आहे. मायग्रेन, किडनी स्टोन, पार्किन्सन्स, मधुमेह, थायरॉईड, संधिवात, मूळव्याध, मानसिक आजार, त्वचा रोग, एलर्जी यांसारख्या विविध व्याधींच्या देशातील व परदेशातील शेकडो रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. कोविड काळात जबाबदारीच्या भावनेने त्यांनी पूर्णवेळ रुग्णसेवा दिली. अनेकांना जीवनदान देण्यासाठी प्रयत्न केले.