राजकीयस्थानिक बातम्या
बदलापूर येथील अत्याचाराचा घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट जळगावात आक्रमक
जळगाव दि.२१ बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ जळगांवात देखील (उबाटा गट) शिवसेना तर्फे निषेध नोंदविण्यात आला. राज्यात महिला मुली सुरक्षित आहे का ? असा सवाल करत त्यांना पंधराशे रुपयाची गरज नसून सुरक्षेची हमी द्या अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे,महानगर प्रमुख शरद तायड, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील,महानगर प्रमुख मनीषा पाटील,गायत्री सोनवणे अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया प्रशांत सुरळकर आदींसह पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती.