जळगावात जागतिक फोटोग्राफीदिन उत्साहात साजरा
जळगाव दि.१९ (धर्मेंद्र राजपूत) प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्यावतीने सोमवारी दिनांक १९ ऑगस्ट रोजी जळगांव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर सीमाताई भोळे, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी, उद्योजक रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष हेमंत पाटील सह मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक फोटोग्राफी दिवस साजरा करत कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले.
प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनच्या उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक
पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व छायाचित्रकार बांधवांना एकत्रित आणत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या कामांची मान्यवरांनी यावेळी भरभरून कौतक केले.
प्रेस फोटोग्राफर, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना विमा कवच
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी महापौर सीमाताई भोळे यांनी सर्व छायाचित्रकार तथा डिजिटल माध्यम प्रतिनिधींना जागतिक छायाचित्रण दिनाच्या शुभेच्छा देत, पोस्टाचा अपघाती विमा काढून देण्याचे यावेळी आश्वासन दिले.
जैन उद्योग समूह नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी
जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, जैन उद्योग समूह नेहमी पत्रकारांच्या पाठीशी आहे.तसेच समाज उपयोगी कार्यक्रमाला नेहमीच आमची साथ मिळेल. जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देत जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे व्हाईस चेअरमन अनिल जोशी यांनी यावेळी सांगितले.
भावी अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा..
फाउंडेशनचे अध्यक्ष हेमंत पाटील जळगावकर यांनी आपल्या कार्यकाळात सदस्यांच्या सहकार्याने भरीव असे कामे करता आले, त्याचबरोबर पुढील अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार संधीपाल वानखेडे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर सर्वानुमते संधीपाल वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वानखेडे यांचा शुभेच्छापर सत्कार करण्यात आला.
आणि सभागृहात हशा पिकला..
पत्रकार आयाज मोहसिन यांनी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजाची मिमिक्री करत शेरोशायरीने सभागृहात एकच अशा पिकवला. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री सुरेशदादा जैन, आ.एकनाथराव खडसे आदी राजकीय नेत्यांच्या आवाजाची मिमिक्री केली.
याप्रसंगी पत्रकार चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, आयाज मोहसीन यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक अभिजित पाटील यांनी मांडले. सूत्रसंचलन संदीप केदार यांनी तर आभार सुमित देशमुख यांनी मानले.
यावेळी फाऊंडेशनचे अभिजीत पाटील, संधीपाल वानखेडे, सुमित देशमुख, जुगल पाटील, प्रकाश लिंगायत, पांडुरंग महाले, धर्मेंद्र राजपूत, चंद्रशेखर नेवे, किशोर पाटील, नितीन नांदुरकर, शैलेश पाटील, जयंत चौधरी, गोकुळ सोनार, कमलेश देवरे, संजय वडनेरे, सोनम पाटील, नाजनीन शेख, संदीप होले, काशिनाथ चव्हाण, विकास पाथरकर, चित्रनिश पाटील, योगेश चौधरी, बंटी बारी, उमेश चौधरी, विक्रम कापडणे, हेमराज सोनवणे, सतीश सैंदाणे, आयाज मोहसीन, सुनील भोळे, अतुल वडनेरे, जकी अहमद, वसीम खान, राजेंद्र माळी, राजेंद्र हरीमकर, ईश्वर राणा, पांडुरंग कोळी, निखिल वाणी, संदीप महाले, प्रकाश मुळे, विजय बारी, धर्मेश घोसर, रामू तायडे, अनुप पानपाटील, पार्थ पाटील आदी छायाचित्रकार उपस्थित होते.