संत ज्ञानेश्वर विद्यालयात अनोख्या पद्धतीने केली रक्षाबंधन साजरी
जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) जळगाव शहरातील मेहरून परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आली यावेळी चक्क झाडांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली.
झाडांमुळे आपल्याला किती फायदे आहे. निसर्गामध्ये झाड किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते, त्याची किती आवश्यकता आहे. याची जाणीव सर्वांनाच आहे. प्रत्येक झाड जगले पाहिजे, झाडाचे संवर्धन झाले पाहिजे याची जनजागृती करण्यासाठी शाळेकरी मुलांनी अनोखा उपक्रम राबविला.
दरम्यान या वेळी सजीव सृष्टीचे रक्षण करणाऱ्या निसर्गाला मानव जातीच्या रक्षणाचे आवाहन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी केले. विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून भाऊ मानून, तुझी आम्हाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.साधारण २०० विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. मुलींनी मुलांना राखी बांधली तर मुलांनी त्यांना गोड भेट दिली. यावेळी सगळे शिक्षक शाळेत उपस्थित होते.