राजकीयस्थानिक बातम्या

नवीन रस्त्यांसाठी निधी, चिंचोलीत एमआयडीसी अधिग्रहणाची प्रक्रिया : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आ. भोळेंचा प्रभाव पुन्हा स्पष्ट 

जळगाव दि.१४ (धर्मेंद्र राजपूत) : शहरातील आमदार सुरेश दामू भोळे अर्थात राजूमामा भोळे यांना विधानसभेसाठी पुढील पंचवार्षिकसाठी पुन्हा संधी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. राजूमामांची गल्ली ते दिल्ली ओळख असण्याने व लोकप्रियतेमुळे राजूमामा यांना पुन्हा पक्षातर्फे संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठीदेखील अनुकूल असल्याचे मंगळवारी दि. १३ रोजी शासकीय कार्यक्रमात पुन्हा एकदा दिसून आपले आहे.

विधानसभेसाठी पुन्हा एकदा संधी मिळण्याचे संकेत 

शहरातील उर्वरित नवीन रस्त्यांसाठी १०० कोटी जाहीर करण्यासह एमआयडीसीचा विस्तार व रोजगार निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याने आ. राजूमामांचे विधानसभेतील वजन पुन्हा एकदा दिसून आले आहे. तसेच राजुमामांचा कामाचा धडाका पाहता व लोकप्रियता पाहता त्यांनाच पुढील पंचवार्षिकीसाठी पुन्हा संधी देण्यात येईल असा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे.भाजपातर्फे आज इच्छुकांची नावे व संभाव्य उमेदवारांची यादी तयार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून यात जळगाव शहर विधानसभेसाठी आ. राजू मामांचे नाव पुन्हा एकदा अंतिम झाल्याचे समजून आले आहे.

नवीन रस्त्यांसाठी निधी, चिंचोलीत एमआयडीसी अधिग्रहणाची प्रक्रिया : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आ. भोळेंचा प्रभाव पुन्हा स्पष्ट 

जळगाव शहर विधानसभेसाठी आ. सुरेश भोळे यांनी गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांचा धडाका तसेच सर्व समाजात त्यांचा वावर यासह त्यांची जनसेवा या सर्व बाबी महत्वाच्या ठरल्या आहेत. शहरासाठी आ. भोळे यांनी वेळोवेळी विकासनिधी देखील मंजूर करून आणला आहे. त्यामुळे शहरात विविध अंगाने विकास झालेला आहे. काही ठिकाणी उणीव आहेत. मात्र पुढील पंचवार्षिकला आ. भोळे हे हि उणीवदेखील नक्की भरतील यात शंका नाही. तसेच, मंगळवारी दि. १३ ऑगस्ट रोजी शहरात “माझी लाडकी बहीण” योजना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते आले होते. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मामांच्या कार्याचा गौरव करून विकासासाठी अजून निधी दिला जाईल असे सूतोवाच दिले.

जळगाव शहराला लागून चिंचोली येथे नवीन एमआयडीसी वसली जाणार आहे. त्याकरिता आता जागा अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेमध्ये सकारात्मकता दर्शवली आहे. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button