राजकीयस्थानिक बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
जळगाव, दि. 12 ( जिमाका ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार 13 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे :-
मंगळवार दि. 13 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 2.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सागर पर्क जळगावकडे प्रयाण, दुपारी 3.00 वाजता ते सायं 5.00 वाजेपर्यंत महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी सागर पार्क, जळगाव येथे आगमन. सागर पार्क, जळगाव येथून सायं. 5.15 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सायं 5.30 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण, सायं 6.30 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण, सायं 7.वाजता वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव