उबाटा गटाच्या जयश्री महाजन यांनी घेतली रिपाईच्या महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांची भेट
जळगांव दि.१. (धर्मेंद्र राजपूत) जळगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या व माजी महापौर यांनी रविवारी महायुतील मित्रपक्ष पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या मोहाडीरोड येथील राजगृह निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी अनिल अडकमोल व सौ. उज्वला अडकमोल यांनी जयश्री महाजन यांचे शाल श्रीफळ फुलगुच्छ देऊन सत्कार केला.
जयश्रीताई महाजन यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी सुरू केल्या आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या असल्याने त्याअनुषगांने या भेटीकडे पाहिले जात आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष्याची शहरात तसेच ग्रामिण भागात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने केलेली आहेत, महाजन परिवाराशी आमचे तांबापूरा मेहरून येथून जुने स्नेहसंबंध आहेत असे अनिल अडकमोल यांनी सांगितले याप्रसंगी आई विमलबाई मुलगी हर्षिका मुलगा सुधम्म तसेच पक्ष्याचे महानगरातील प्रमुख पदाधिकारी प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, गौतम सरदार, किरण अडकमोल माजी महापौर यांचे स्वीय सहाय्यक ललीत धांडे उपस्थित होते,