जळगाव दि.30 (धर्मेंद्र राजपूत) कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा पोलीस दल व इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील 104 पोलिसांनी केले रक्तदान
या रक्तदान शिबिरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सूगरवार यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह 104 अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी रेडक्रॉस रक्त केंद्राच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिराचे आयोजन करून या जीवनदायी कार्यात सहभाग घेऊ असे आश्वासन दिले.
अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधिक्षक गृह प्रमोद पवार, उपविभागीय पोलीस अधिक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत शुगरवार, तसेच इंडियन सोसायटी जळगावचे उपाध्यक्ष गनी मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाषजी साखला, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांचे सह कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिराचे आयोजन करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक रेश्मा अवतारे, उपनिरीक्षक मंगल पवार, उपनिरीक्षक रामेश्वर सोळंके, पोलीस उपनिरीक्षक देविदास वाघ, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश देसले यांनी परिश्रम घेतले.