धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

धरणगाव दि.2ऑगस्ट (धर्मेंद्र राजपूत) धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली.
भजनी मंडळास साहित्य दिल्याचे मानले आभार तर मंगल कार्यालयासाठी केली ५० लाखांच्या निधीची मागणी !
पाळधी येथील निवासस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्वप्रथम पंच मंडळातील सदस्यांनी भजनी मंडळास साहित्य दिल्याबद्दल गुलाबभाऊंचे आभार मानले. तसेच पाटील समाज मंगल कार्यालयासाठी ५० लाखांच्या निधीची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाज अध्यक्ष माधवराव पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष भीमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, सहसचिव दिनेश पाटील, वाल्मिक पाटील मोठ्या संख्येने समाज बांधवांची, पंच मंडळातील सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.