फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश
जळगाव दि. ३० (धर्मेंद्र राजपूत) -जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुका चे प्रमुख क्रीडा अधिकारी श्री. प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमी चे रवींद्र धर्माधिकारी,काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल च्या क्रीडा शिक्षिक अजय काशीद व रुस्तमजी स्कूल च्या क्रीडा शिक्षिक नरेंद्र तळेकर विवेकानंद प्रतिष्ठान सेमीची क्रीडा शिक्षिका रामेश्वरी वाणी, शानभाग चे संजय यादव एकरा चे अमीर खान एल एच पाटील चे क्रीडा शिक्षक किशोर भोई आधी उपस्थित होते.
शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा
अंतिम निकाल
१४ वर्षे मुले
ब.गो.शानभाग विजय
रुस्तमजी इंटरनॅशनल उपविजय
१४ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
विवेकानंद प्रतिष्ठान सेमी उपविजय
१७ वर्षे मुले
अनुभूती निवासी स्कूल विजयी
ब.गो.शानभाग उपविजय
१७ वर्षे मुली
रुस्तमजी इंटरनॅशनल विजय
ब.गो.शानभाग उपविजय
विजयी झालेल्या सांघांन अनुभूती निवासी स्कूल चे अध्यक्ष श्री. अतुल जैन, संचालिका श्रीमती निशा जैन, प्राचार्य श्री. देबाशिष दास , व्यवस्थापक श्री. विक्रांत जाधव यांनी
कौतुक व अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साठी
जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्व खाली सुरज सपके,धनंजय धनगर,वसीम शेख,दीपक सस्ते आयान शेख,दिनेश पावरा,तुषार गुजर,शुभम पाटील,विकास बारी आकाश कांबळे परिश्रम घेत होते