६० ब्युटीशियन मध्ये फाल्गुनी पार्लरच्या संचालिका मीनाक्षी वसाने यांना प्रथम पारितोषिक
जळगांव दि.16: जळगाव शहरातील सायली कॉस्मेटिक तर्फे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजी नाट्यगृह येथे मेकअप सेमिनार ब्रायडर अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता.
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते यासाठी आपले ब्युटिशियन खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. म्हणूनच मेकअप वर्कशॉप हे आयोजित केले जातात.जळगाव जिल्ह्यातील तब्बल 60 ब्युटीशियनने या मध्ये सहभाग घेतला होता. आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अतुल चौहान (सर )यांच्या हस्ते नाभिक समाजाच्या फाल्गुनी पार्लरच्या संचालिका मीनाक्षी वसाने यांना बेस्ट ब्रायडल अवॉर्ड शो मध्ये फर्स्ट प्राइस पटकवल्याबद्दल प्रमाणपत्र सह ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. प्रोत्साहन म्हणून आमदार राजू मामा भोळे यांच्यातर्फे रु- 11000 रोख बक्षीस यावेळी देण्यात आले.