आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाने काढली दिंडी
जळगाव दि.16 (धर्मेंद्र राजपूत): शहरातील मेहरून येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली.
विठू नामाच्या जपा बरोबरच वृक्षारोपणाला मदत म्हणून बिया वाटून पर्यावरण संरक्षणांची जनजागृती
दिंडीच्या माध्यमातून झाडे जगवा, झाडे वाचवा संदेश देत परिसरातील भाविकांना प्रसाद म्हणून वृक्षारोपणाला मदत म्हणून बिया वाटप करण्यात आल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता. विठ्ठल नामाच्या जपा बरोबरच विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृती केली. वृक्षरोपण करून इतरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.