मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिले निवेदन
जळगांव दि.22 (धर्मेंद्र राजपूत) शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नामदेव वंजारी समवेत त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन दिले. हे निवेदन समस्त वंजारी समाज सेवा संस्था मेहरूण संचलित जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे देण्यात आले.
माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिलेल्या निवेदनात इतर मागास प्रवर्गातील जातींच्या यादीत नव्या १० पोटजातींचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान वंजारी जात भटक्या जमाती ‘ड’ मध्ये समाविष्ट असून या प्रवर्गास २.५ टक्के आरक्षण आहे. वंजारीच्या वंजार आणि वंजारा अशा दोन तत्सम जाती होत्या. त्यात आता ‘लाड वंजारी’ या जातीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.यासंदर्भात अधिसुचना काढून समाजास सहकार्य करावे, निवेदन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग , पुणे यांनी वंजार आणि वंजारा अशा जाती होत्या, त्यात आता लाडवंजारी जातीचा नव्याने समावेश केल्याबाबतचा शासनाकडे सादर केलेला असुन तो स्विकारला आहे.