माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आण्णासाहेब एम. के. पाटील यांना जागतीक ग्लोबल बायोफ्यूल पुरस्कार प्रदान
जळगाव दि.18/6 : बायोफ्यूल ( अपारंपारीक इंधन ) या विषयावर दिनांक 05/06/2024 ते दिनांक 07/06/2024 या तीन दिवसीय दिल्ली येथील इंडिया एक्सपो सेंटर, ग्रेटर नोयडा या विभागात जागतिक चर्चासत्र व प्रदर्शन पार पडले. या कार्यक्रमात माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आण्णासाहेब एम. के. पाटील यांना “जागतिक ग्लोबल बायोफ्यूल पुरस्कार 2024” देऊन गौरविण्यात आले.
नैसर्गिक इंधने या सत्रातील माहीतगार व तज्ञ मान्यवरांचा सत्कार माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आण्णासाहेब एम. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अंतिम टप्यात माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री आण्णासाहेब एम. के. पाटील यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “जागतिक ग्लोबल बायोफ्यूल अॅवार्ड” देण्यात आले. या चर्च्यासत्रात विविध देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला. यात प्रामुख्याने शास्त्रज्ञ, कारखानदार, कच्चा माल पुरवठादार, प्रक्रिया तंत्रज्ञ, मशिनरी व त्यासंबधीतले साहित्य पुरवठादार, उपभोक्ता, मार्केटिंग प्रतिनिधी उपस्थित होते.
तत्कालीन पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालखंडात सन – 2000 मध्ये आण्णासाहेब एम. के. पाटील यांनी यासंबंधीचे बील पार्लमेंट मध्ये ठेवले होते. व ते बील संमत झाले होते. तेव्हापासून देशात एथेनॉल, बायो डिझेल, बायोगॅस, बायो सीएनजी इ. चा उपयोगाला सुरुवात करण्यात आली.
आज देशामध्ये क्रूड ऑइल म्हणजेच पेट्रोल, डिझेलसाठी लागणारे तेल जगातून सुमारे 18 लाख कोटीचे आयात केले जाते. किंबहुना देशातील व्यापारी तोटा सुमारे 45% केवळ इंधनापोटी खर्च होतात. तसेच त्यापासून प्रदूषण ही फारमोठ्या प्रमाणावर होते. प्रदूषण कमी करण्यासाठी बायोफ्यूलचा वापर अतिशय महत्वाचा व पर्यायी मार्ग म्हणून अंबलण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यामुळे देशातील स्वावलंबन बरोबरच विविध वाया जाणाऱ्या पदार्थांचा वापर ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल व रोजगार भरपूर प्रमाणावर उपलब्ध होईल आणि प्रदूषण हटविण्यात यश मिळेल.