स्थानिक बातम्याराजकीय
भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा
जळगाव : महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना भीम आर्मी आणि आदिवासी टायगर सेना या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या दोन्ही संघटनांच्या पाठिंब्यामुळे करण पाटील यांची ताकद वाढली आहे.
शहरातील तांबापुरा येथे मंगळवार दि. १ रोजी झालेल्या सभेत भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक जाधव यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील मोरे यांनी देखील करणदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला.याप्रसंगी नानाभाऊ महाजन, दशरथ महाजन, जगदीश पाटील, रमेश महाजन, प्रमोद महाजन, आर. डी. पाटील, राजेंद्र शिंदे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.