राज्यशैक्षणिकस्थानिक बातम्या

शेतीतूनच समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल – अनिल जैन

जळगाव, दि. २९ (धर्मेंद्र राजपूत)- ‘शेतीत नावीण्यपूर्ण प्रयोग करून शेतीतून समृद्धी आणि प्रतिष्ठा मिळवू शकता. २०४७ पर्यंत भारत विकसीत देश बनेल व त्यासाठी कृषी क्षेत्र अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.’ भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यातील समारोपाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बँरी, ज्या कंपन्यांनी या कार्यक्रमास सहयोग दिला त्या कंपनीचे प्रतिनिधी अजय तुरकने, सुचेत माळी(रॅलीज इंडिया), डॉ. शविंदर कुमार (महेंद्रा), मयूर राजवाडे, अजिंक्य तांदळे (यूपीएल), जयंत चॅटर्जी, प्रवीण कासट आणि राजकुमार (स्टार अॅग्री), डॉ. समीर मुरली, गौतम पात्रो (गोदरेज अॅग्रोव्हेट), डॉ. दिलीप चौधरी (अमूल) आणि जैन इरिगेशनचे डॉ. बी.के. यादव, डॉ. प्रकाश पंचभाई यांची उपस्थिती होती.

जैन हिल्स येथे फालीच्या १० व्या संम्मेलनाचा समारोप

फालीच्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधताना अनिल जैन म्हणाले की, शेती क्षेत्रात खूप मूल्यवर्धन करण्याची संधी आहे. शेतीतून सर्वांना अन्न-धान्य प्राप्त होते परंतु सौंदर्य प्रसादने जरी बनवायचे असतील तरी त्यासाठी फळे, फुले लागत असतात. शेतीमध्ये प्रामाणिक कार्य केले तर तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास निर्माण करत भविष्यात तुम्हाला शेती संदर्भात काही मार्गदर्शन लागले तर जैन इरिगेशनचे तज्ज्ञ सहकार्य करतील. फालीच्या माध्यमातून तुम्ही शेतीमध्ये काम कराल ही सकारात्मक गोष्ट असल्याचे ते म्हणाले. यावेळी फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी सुसंवाद साधला. त्यांनी दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्याच्या भाषणाचा अनुवाद फालीच्या मॅनेजर रोहिणी घाडगे यांनी केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन हर्ष नौटियाल यांनी केले.

बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन विजेते

ॲग्रीकल्चरल वेस्ट इको फ्रेंडली बेस्ट, शारदा पवार विद्यानिकेतन शारदानगर, पुणे (प्रथम), डीओसी ट्रेझर-जनता गर्ल हायस्कूल शेंदुरजन घाट जि. अमरावती (द्वितीय), काऊ डंग प्रोडक्ट- सोमेश्वर विद्यालय मुढाळे जि. पुणे (तृतीय), पर्पल सेलिब्रेशन- श्री विठ्ठल माध्यमिक अँड ज्युनियर कॉलेज भिकोबानगर जि. पुणे (चौथा), व्हेजिटेबल डीहायड्रेशन (नूतन माध्यमिक विद्यालय किनगावराजा जि. बुलढाणा (पाचवा) असे विजेते ठरले व त्यांचा गौरव मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.

नाविन्यपूर्ण इंनोव्हेशन विजेते

सेफ्टी स्टिक – महात्मा गांधी विद्यालय आष्टा जि. सांगली (प्रथम), स्मार्ट ॲग्री स्प्रेअर- दानोली हायस्कूल दानोली जि. कोल्हापूर (द्वितीय), स्टार्टर चेंबर फॉर बिगिनर्स अँड ऑफ सिझन क्रॉप्स- जयश्री पेरिवाल इंटरनॅशनल हायस्कूल जयपूर (राजस्थान) (तृतीय), एआय बेस्ड सोलार इन्सेक्ट ट्रॅप ॲण्ड फार्म प्रॉटेक्शन सिस्टीम फॉर ॲनिमल- महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय देऊळगावमाळी जि. बुलढाणा (चौथा), रेन पाईप (एचडीपीई) रॅपर- आदिवासी विकास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खजरी जि. गोंदिया (पाचवा) असे विजेते ठरले.

संवाद, पत्रकार परिषद

शालेय जीवनापासूनच शेती करणे कसे फायद्याचा, उत्तम व्यवसाय आहे हे समजावून देणे प्रत्यक्ष अनुभव देण्याचे काम फलीला माध्यमातून केले जात आहे. गेल्या दहा वर्षांपासून केले जात आहे. या दहा वर्षात चाळीस हजार विद्यार्थ्यां पर्यंत फालीचे काम पोहोचले आहे. या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील १७५ शाळांच्या सुमारे १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. भविष्यात २०३२ पर्यंत २५ लाख विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे अशी माहिती फालीचे चेअरमन तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी दिली. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील पत्रकारांशी संवाद साधला. फालीचे माजी विद्यार्थ्यांनी फालीमुळे आपली प्रगती कशी झाली याबाबत अनुभव कथन केले. रोहिणी घाडगे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला. पत्रकार परिषदेचे संचालन व आभार प्रदर्शन जैन इरिगेशनचे मीडिया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जैन यांनी केले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button