राजकीयस्थानिक बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे दोन्ही उमेदवार गुरूवारी अर्ज दाखल करणार

  1. जळगाव : जळगांव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती रक्षा खडसे ह्या उद्या गुरुवारी (ता.२५ एप्रिल) दुपारी भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी महायुतीकडून करण्यात येणार असल्याचे समजते

जळगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, शिवसेना नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादीचे नेते तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

या प्रसंगी महायुतीचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण (महायुतीचे समन्वयक), संजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक) आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के.अण्णा पाटील, माजी खासदार ए.टी.नाना पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष भाजपा), अमोल हरिभाऊ जावळे (जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष भाजपा), उज्वलाताई बेंडाळे ( जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा भाजपा), नंदकिशोर महाजन (भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख), डॉ.राधेश्याम चौधरी, (भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख), निलेशभाऊ पाटील (जळगाव जिल्हाप्रमुख शिवसेना), रावसाहेब पाटील (जळगाव जिल्हा प्रमुख शिवसेना), वासुदेव पाटील (जळगाव जिल्हा प्रमुख शिवसेना), जमील देशपांडे (जिल्हाध्यक्ष मनसे), अभिषेक भाऊ पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष) मीनलताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सोनालीताई नारायण पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), सरिताताई माळी-कोल्हे (शिवसेना), गणेशभाऊ सोनवणे (शिवसेना), आनंदभाऊ खरात ( RPI आठवले गट), अनिल अडकमोल (आठवले RPI) राजूभाऊ मोरे (RPI कवाडे गट), दिनेश खरात (लहूजी सेना ), श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button