खासदार रक्षा खडसे यांचा जामनेर तालुक्यात कार्यकर्ता मेळावा
जळगांव दि.28 (धर्मेंद्र राजपूत): भाजपा व महायुती चे रावेर लोकसभेचे उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ निवडणूक नियोजनासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाने आज पारस मंगल कार्यालय शेंदुर्णी येथे
शेंदुर्णी गट, शेंदुर्णी शहर, लोहरा कळमसरा गट यांचा भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच खासदार रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.जोमाने कामाला लागून, आपल्या बुथवर जास्तीतजास्त मतदान भाजपाला मिळवून देण्याचे यावेळी आवाहन करण्यात आलेलं आहे.
याप्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जामनेर नगर परिषद नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन, मा.जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, संजय गरुड, जिल्हा सरचिटणीस नवल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर, जे.के.चव्हान, उत्तमदादा थोरात, सह कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित उपस्थित होते.