स्मिताताई वाघ यांनी घेतली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
दि.27/3/24 (धर्मेंद्र राजपूत) जळगाव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांनी नुकतेच जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री सुरेशदादा जैन यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.या भेटीत सुरेश दादा जैन यांनी स्मिता ताईना विविध विषयांवर मार्ग दर्शन केले.विकासाच्या संदर्भात केलेल्या कामाची पावती निश्चितपणे मिळते,त्यामुळे नागरिकांचा उमेदवारावर विश्वास दृढ होत जातो.लोकसभेच्या मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन वेगळे असते, तेथील प्रश्न देखील विविध स्वरूपाचे असतात. या समस्या सोडवन्यावर लक्ष दिले पाहिजे. ग्रामीण भागाच्या विकासाचे चित्र बदलण्याची क्षमता जिल्हा परिसदेत असते,आणि स्मिता ताई तुम्ही जिल्हापरिषेद अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केलेले आहे अश्या भावना या भेटी प्रसंगी व्यक्त केल्या व ताईंना शुभेच्छा पर आशीर्वाद दिले.