राजकीयशैक्षणिकस्थानिक बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष जळगाव महानगर अध्यक्षपदी विक्की ईश्वर राजपूत यांची निवड
- जळगांव दि.6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे वैद्यकीय मदत कक्ष हा सेवेसाठी प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे.
या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य प्रमुख जितेंद्र सातव, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय मदत कक्ष महानगराध्यक्षपदी विक्की राजपूत यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.जळगांव व जिल्ह्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आपण प्रयत्न करून त्यांना मदत करणार असल्याचे विक्की राजपूत त्यांनी सांगितले