पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात, जळगांव अँटी करप्शन ब्युरोची कारवाई
जळगांव दि.३१ रोजी चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांची पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता. त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला / बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली. दि. ३१/०१/२०२४ रोजी पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता आलोसे यांनी तडजोडीअंती त्यांना ५ हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती. शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,
जळगांव जिल्ह्याचे ला.प्र. विभाग पोलीस उप अधीक्षक, सापळाचे प्रमुख श्री.सुहास देशमुख,
सापडा पथकातील-दिनेशसिंग पाटील
पो.ना.बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने व कारवाई साठी मदत पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, स.फौ. सुरेश पाटील, पो.ह. रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर, पो. ना किशोर महाजन, पो.ना सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ, पो. कॉ. प्रणेश ठाकुर, पो. शि अमोल सूर्यवंशी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.