जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्थेवर चेअरमनपदी दिलीप गायकवाड
जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्थेवर चेअरमनपदी दिलीप गायकवाड
जळगाव (धर्मेंद्र राजपूत) : येथील जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगावची पंचवार्षिक निवडणूक मंगळवारी २३ जानेवारी रोजी घेण्यात आली. सन २०२३ ते २०२८ करिता सर्व ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. या संचालकांमधून चेअरमनपदी दिलीप नामदेव गायकवाड यांची तर व्हाईस चेअरमनपदी सरफराज सिकंदर तडवी यांचीदेखील बिनविरोध निवड झाली.
जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था १९९४ पासून कार्यरत असून आजपर्यंत संचालकांची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली आहे. संस्थेचे ५५० सभासद असून विविध योजना राबविणे, १० लाखांपर्यंतचे कर्ज संस्था देते. पतसंस्थेची निवडणूक मंगळवारी २३ रोजी तज्ज्ञ संचालक दत्तात्रय चौधरी, सल्लागार महेंद्र बागुल यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सर्वसाधारण जनरलमधून ६ पैकी ६ उमेदवार उभे होते. त्यामुळे ते सर्व बिनविरोध आले. तसेच, महिला राखीव मधून छाया योगराज पाटील, सुरेखा भीमराज लष्करे, इमावमधून जितेंद्र हिरासिंग परदेशी, अजा-अज मधून सुधीर गोरखनाथ करोसिया, भविजामधून दिलीप नामदेव गायकवाड हे बिनविरोध आलेत.
सर्वसाधारण जनरलमधून उदय एकनाथ बोंडे, मनोज मंगल पाटील, अमित मनोहर वागदे, मंगेश दंगल बोरसे, सरफराज सिकंदर तडवी, विनोद सांडू चौधरी यांची निवड झाली. यानंतर विजयी सभासदांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. पी. कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी सूर्यकांत पाटील, शरद देशमुख, ज्ञानदेव पाटील, सुभाष भोळे, चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते.