जळगांवात शिवसेना तर्फे घोषणाबाजी देत चिन्ह गोठवल्याचा निषेध
जळगांव 10 : शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून काही कारणांमुळे गोठविण्यात आल्यानंतर जळगावातील शिवसैनिकांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना महानगर तर्फे आज मनपा समोर घोषणाबाजी देत निषेध नोंदविण्यात आला.दरम्यान शिवसैनिकांनी आक्रमक होत सरकार हमसे डरती है निवडणूक आयोग को आगे करती है,पन्नास खोके खाऊन खाऊन माजले बोके, निवडणूक आयोग कोणाचे गद्दरंचे,गडदरांनी चिन्ह गोठवले खुद्दर्रांचे रक्त पेटले आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.
या प्रसंगी शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, धरणगाव मा नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवा सेनेचे विराज कावडिया, कोळी युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, महीला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जकीर पठाण मंगला बारी, मनीषा पाटील, प्रशांत सुरडकर अमित जगताप सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते