क्राईमस्थानिक बातम्या

ओव्हरटेक करतांना चाकचाकी वाहनाने ब्रेक मारल्याने मागून येणारी दुचाकी आदळली; दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव Times  दि 18.9.23 प्रवासी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाने अचानक ब्रेक मारल्याने मागुन येणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी आदळून दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ममुराबाद गावाजवळच्या फार्मसी कॉलेजजवळ रविवारी १७ सप्टेंबर रोजी दुपारी  सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या दोघांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार संदीप सुरेश होले (वय-३६) रा. जुने जळगाव हे आपल्या पत्नी देवयानी संदीप होले यांच्यासोबत रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी जळगाव तालुक्यातील तुरखेडा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएस ४७७९) ने गेले होते. दुपारचा सुमारास जळगाव येथे घरी परतत असतांना तालुक्यातील ममुराबाद गावानजीकच्या फार्मसी कॉलेज जवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या पुढे एक खासगी चारचाकी इको व्हॅन  प्रवाशांना दाटीवाटीने घेवून जात होते. चारचाकी वाहनाने पुढे जात असलेल्या बैलगाडीला ओव्हरटेक करत असतांना अचानक ब्रेक मारला. तेवढ्यात मागून येत असल्याने दुचाकी वाहनावर आदळल्यान संदीप होले व त्यांची पत्नी देवयानी होले हे रोडवर फेकले गेले. यात देवयानी होले यांच्या कंबरेला व हाताला दुखापत झाली तर संदीप होले यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला जबर मार बसला. त्यांना तात्काळी शहरातील खासगी रूग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीसह मोबाईलचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळाहून चारचाकी वाहनावरील अज्ञात वाहनचालक हा वाहन घेवून फरार झाला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आलेली नाही.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button