स्थानिक बातम्या

शनिपेठेत श्रीराम नवमीचा उत्साह; पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाली भव्य मिरवणूक

शनिपेठ मित्र मंडळ आयोजित

जळगाव:दि.26 दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र शुक्ल पक्ष नवमी अर्थात श्रीराम नवमीनिमित्त शनिपेठ मित्र मंडळातर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक मुकुंदा सोनवणे यांच्या कार्यालयापासून निघालेली ही मिरवणूक भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पारंपरिक ढोल-ताशा पथक, विलोभनीय सजावट आणि करण्यात आलेली आकर्षक रोषणाई होती. ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने संपूर्ण शनिपेठ परिसर दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे, यंदाच्या मिरवणुकीत महिलांचा सहभाग अत्यंत लक्षणीय ठरला. शनिपेठ महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीची शोभा वाढवली.

याप्रसंगी शनिपेठ मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. मुकुंदा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात शिस्त आणि जल्लोषाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत निघालेल्या या मिरवणुकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button