जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी जिल्ह्याभरातील महिलांसाठी अनोखा कार्यक्रम


Jalgaon Times News
जळगांव दि.19 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जळगाव शहरात महिलांसाठी एक विशेष आणि बहुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून स्वप्न साकार फाउंडेशन संचलित “अग्नीशीखा” महिला ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या २२ मार्च 2026 रोजी जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडणार असल्याची माहिती झालेल्या पञकार परिषदेत अग्निशिखा महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष भारती काळे यांनी दिली.
कार्यक्रमाचे विशिष्ट
महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणाच्या दृष्टीने विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन,वाढते सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करून महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन,याशिवाय महिलांच्या आरोग्याशी संबंधित महिन्याला येणाऱ्या समस्यांबाबत (मासिक पाळी व इतर आरोग्य विषय) तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष चर्चासत्र,व्यसनमुक्तीपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले असून समाजातील व्यसनाधीनतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगावात प्रथमच महिलांसाठी असा बहुआयामी कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, उत्कृष्ट काम करणाऱ्या नर्सेस व डॉक्टर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
याना करण्यात येणार आहे सन्मानित
डॉक्टर निलेश चांडक,डॉक्टर सीमा पाटील,डॉक्टर पूजा सोमानी,डॉक्टर प्राची महाजन,डॉक्टर नितीन विसपुते, डॉक्टर अविनाश खेलवाडे,प्राध्यापक वासुदेव पाटील, डॉक्टर श्रद्धा राणे, डॉक्टर शीतल पाटील,सौ. जागृती येवले, सौ. तृप्ती कांकरिया, सौ युगंधरा सोळुंके, डॉक्टर अवधूत चौधरी,डॉक्टर रुकसाना खान याना अग्नि शिका महिला ग्रुपच्या वतीने खान्देश रत्न पुरस्काराने येत्या रविवारी सन्मानित करण्यात येणार आहे.




