चैत्र पालवी स्वरोत्सव उत्साहात संपन्न


जळगांव(धर्मेंद्र राजपूत) दि.19 स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “चैत्र पालवी स्वरोत्सव” मैफल गुढी पाडव्याला जळगावातील महात्मा गांधी उद्यानात उत्साहात संपन्न झाली. भक्ती गीते, अभंग, नाट्यगीत व सुगम सांगितले नटलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरे नुसार गुरु वंदनेने झाली. गुरु वंदना प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी सदर केली. दीप प्रज्वलन जळगाव नगरीच्या प्रथम नागरिक व महापौर सौ. दीपमाला काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, आमदार राजूमामा भोळे व दीपक चांदोरकर यांच्या हस्ते झाली. आणि सुरू झाला एक सुरेल मंगलमय गीतांचा प्रवास. वरूण नेवे, सौ. श्रुती जोशी व बासरी वर राजेश्वरी रत्नपारखी यांनी गीते सादर केली. यात प्रामुख्याने
ओंकार स्वरूपा -श्रुती ,वरुण
आरंभी वंदिन अयोध्येचा राजा – वरुण, गगन सदन तेजोमय – श्रुती
शून्य गड शहर – वरूण, देवाघरचे ज्ञात कुणाला – श्रुती
आम्हा नकळे ध्यान – वरुण, मन मंदिरा – बासरी राजश्री
विष्णुमय जग – वरुण, संत भार पंढरीत – श्रुती
बाजे मुरलिया बाजे-श्रुती वरुण, मी राधिका – श्रुती
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा – राजेश्वरी बासरी
अवघा रंग एक झाला या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवते निवेदन सौ. प्रिती झारे यांनी करून ही मैफल एका विशिष्ट उंचीवर नेली. आभार प्रदर्शन सौ. नुपुर खटावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्निग्धा कुलकर्णी व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन चे सहकार्य मिळाले.




