जळगांव 17. (धर्मेंद्र राजपूत) श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने भव्य तिरंगा सन्मान रॅलीने काढण्यात आली. 15 ऑगस्ट च्या सकाळी ८ वाजता शिंपी समाजाचे शेठ फत्रू लक्ष्मण वसतिगृह येथे ध्वजारोहण करून वसतिगृह येथून ८:३० तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. रॅली पंचमुखी हनुमान मंदिर, पांडे डेअरी चौक, सिव्हिल हॉस्पिटल, पुष्पलता बेंडाळे, राजकमल सुभाष चौक, रथ चौक मार्गे शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमाबाई जगताप सामाजिक सभागृह येथे झाला या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे ७५ फूट असलेल्या तिरंगा तयार करण्यात आला होता व त्याला समाजातील महिला मंडळ युवक मंडळ व समाज बांधवांनी आपल्या हातामध्ये पकडला होता २ किलोमीटर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर जागो जागी रॅलीचे स्वागत समाजातील उद्योजक व समाज बांधवांनी केले यात राम जगताप किरण व उमेश शिंपी अशोक सोनवणे प्रमोद शिंपी, राकेश शिंपी, राहुल शिंपी, अमित जगताप चार्ली शिंपी सतिष सोनवणे, गिरीश देवरे शरदराव बिरारी स्वप्निल जगताप यांनी तिरंगा रॅली वर पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले तसेच भवानी मंदिर व रथ चौक येथे दिपक तरून मंडळ यानी हि स्वागत केले त्या पूर्वी पुष्पलता बेंडाळे चौक येथे राणी लक्ष्मीबाई व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्रकुमार सोनवणे,जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी, उपाध्यक्ष विवेक जगताप, प्रकल्प प्रमुख मुकुंद मेटकर, सचिव अनिल खैरनार, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे दिपक जगताप प्रदिप शिंपी राजेंद्र बाविस्कर सतिष जगताप सुरेश सोनवणे हेमंत शिंपी सुमित अहिरराव यांनी केले या रॅलीत पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ मोठ्या संख्येने सफेद कपडे परिधान केले होते जागोजागी भारत माता वंदे मातरम च्या जय घोषाने संपूर्ण परिसर हा देशभक्ती मय वातावरणाने निर्माण झालेला होता जळगाव शहरात भव्य दिव्य या तिरंगा सन्मान रॅलीच्या आकर्षण करून घेतले होते तसेच सजीव देखावे सुद्धा या ठिकाणी केले होते भारत मातेचा प्रतिमा तिरंगा रग फुगयानी सजवलेल्या ट्रॉली वर भारत मातेचा फोटो तसेच सजीव देखावा मध्ये भारत तसेच नेताजी सुभाषचंद्र महात्मा गांधी राजगुरू सुखदेव संत नामदेव महाराज हे सजीव वेशभूषेमध्ये बाल कलाकार उपस्थित होते रॅलीच्या पुढे दोन अश्वावर राणी लक्ष्मीबाई व जिजामा च्या वेशभूषेमध्ये दोन युवती होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील रत्नाकर बाविस्कर दिलीप भांबरे गणेश सोनवणे सुधाकर कापुरे योगेश सोनवणे दत्तात्रय वारुळे किरण सोनवणे यासह असंख्य युवक व महिला मंडळ व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले .